ntpc recruitment 2022 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी ८६४ अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी जाहिरात दिली आहे.आम्ही या भारतीसंदर्भात पदाचे नाव, रिक्त जागा, अर्ज प्रकार, अर्ज फी, पात्रता इत्यादी खालील लेखात दिलेली आहे. सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचून आपली पात्रता तपासावी. तसेच पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरवात करावी.

ntpc recruitment 2022

NTPC भरतीसाठी अर्ज ऑनलाइन सबमिट करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी त्यांचा ऑनलाइन अर्ज ११ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सबमिट करावा. ऑनलाईन अर्जाची लिंक तसेच अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे. निवडलेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये पोस्टिंग केले जाईल.


महत्त्वाचे मुद्दे


संस्थेचे नाव : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)
पदाचे नाव : अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी
रिक्त पदांची संख्या : ८६४ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ११ नोव्हेंबर २०२२
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत


रिक्त जागांची माहिती


पदाचे नाव व रिक्त जागा

अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदे – ८६४
एकूण – ८६४

शैक्षणिक पात्रता:


उमेदवारांकडे संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे


निवड प्रक्रिया

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडची निवड GATE 2022 स्कोअरवर आधारित असेल


पगार


किमान पगार: रु. ४०,०००/-
कमाल पगार: रु. १,४०,०००/-


अर्ज शुल्क –

कृपया अधिकृत जाहिरात पहा


वयोमर्यादा :

अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्षे आहे.


अर्ज कसा करावा?

१. अधिकृत वेबसाइटवर जा
२. भरती विभागात जा
३. तुम्हाला ज्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे त्या पोस्टसाठी जाहिरात उघडा आणि वाचा
४. तुम्ही अर्ज भरण्यास पात्र असल्यास अर्ज करा. अर्जात आवश्यक माहिती भरा.
५. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती जोडा.
६. अर्ज फी भरा
७. शेवटच्या दिवसापूर्वी फॉर्म सबमिट करा. अर्जाची प्रिंटआउट घ्या.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
PDF जाहिरात : येथे क्लिक करा